HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीत खडसेंच्या राजकीय भवितव्याचं काय ? खडसेंनी भाजपला का दिलाय इशारा ?

अनेक महिने सातत्याने नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम ठोकत काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नुकत्याच जळगावमध्ये झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलेत. पण कशामुळे ? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. एकीकडे जळगाव या आपल्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसेंना स्थानिक पातळीवरच्या गटबाजीला सामोरे जावे लागत असतानाच राष्ट्रवादीत त्यांचे राजकीय भवितव्य काय ? याच प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय. खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्याचा आमचा विचार होता. त्यांच्या नावाची आम्ही शिफारसही केली होती. मात्र, राज्यपालांनी शिफारस केलेल्या नावांवर अद्याप निर्णय घेतला नाही, असे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आता पुढे काय ? असा प्रश्न उपस्थित होतोच. या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला लक्ष्य केले. खडसे म्हणाले, नाथाभाऊला कसे तुरूंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा खडसेंनी दिला.

#EknathKhadse #JayantPatil #NCP #SharadPawar #Maharashtra #DevendraFadnavis #GirishMahajan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !

News Desk

Ajit Pawar allegation on Poonam Mahajan |तुमची औकात काय तुम्ही बोलताय काय!

Atul Chavan

विधानभवनाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन

News Desk