HW News Marathi
व्हिडीओ

निलेश लंकेनी मनसे नेत्याला पाठवली १ कोटींची नोटीस! वाद शिगेला…

कोविड केअर सेंटरमध्ये आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वत:ला रुग्णसेवेत गुंतवून घेतलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला एक कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे. यावर मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केला असून स्वत:ला फकीर म्हणवून घेणाऱ्या लंके यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल मनसेने केला आहे.मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार आणि आमदार लंके यांच्यात हा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी आमदार लंके यांनी आपल्याला फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. लंकेंवर आरोप करणारा व्हिडिओही पवार यांनी प्रसारित केला होता. त्यामध्ये लंके यांच्यासोबतच ते चालवित असलेल्या कोविड केअर सेंटरसंबंधीही आरोप केले होते. शिवाय लंके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. यानंतर पवार यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला.

#nileshlanke #avinashpawar #mns #ncp #covid #mahavikasaghadi #parner #covidcenter #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

18 वर्षांपुढील लसीकरणात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला टाकले मागे! नेमके काय आहे कारण?

News Desk

Shivsena नाव आणि धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा आरोप

News Desk

राज्यपालांचं भाजपला पुन्हा झुकतं माप ? ‘या’ फोटोमुळे झाले ट्रोल !

News Desk