गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. मात्र, या प्रकरणावरील प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय यांना आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून धनंजय मुंडे कुटुंबातही एकटे पडलेत का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
#DhananjayMunde #PankajaMunde #SharadPawar #NCP #BJP #OBC #GopinathMunde #MahavikasAghadi #DevendraFadanvis #ChandrakantPatil