महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ईडीच्या याच कारवाईच्या निषेधार्थ आज म्हणजेच गुरुवारी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार आनि अजित पवार यांच्यावर ईडीच्या वतीने दाखल केल्याल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बुधवारी बारामती आणि पुण्यात बंद पाळण्यात आला होता. तर आज याच पार्श्वभूमीवर आज परभणी शहरात पाळण्यात बंद पाळण्यात आला. त्यामुळे परभणी शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परभणी शहरातील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.