HW News Marathi
व्हिडीओ

Prataprao Jadhav – Vijayraj Shinde | बुलढाण्याची उमेदवारी मागण्याचा पहिला अधिकार माझाच !

बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड होता. मात्र या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये २ गट पडले. गेल्या 2014 च्या निवडणूकमध्ये शिवसेनेला या गटबाजीचा फटका बसला होता. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे याची जनआशिर्वाद यात्रा बुलडाणा येथे आली होती त्यावेळी काही अंतरावर २ स्वागत सभा झाल्या. त्यामध्ये मुख्यता एक गट होता शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे व दुसरा गट होता खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा. त्यामुळे शिवसेना पक्षात दोन गट असल्याचे दिसून आले. या दोन्ही गट या उमेदवारीसाठी आता रस्सीखेच सुरू असून या दोन्ही गट उमेदवारी मागत आहे. “ही उमेदवारी मागण्याचा पहिला अधिकारी माझा असून मलाच उमेदवारी मिळणार”, असा दावा माजी आमदार विजय राज शिंदे यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी जेव्हा विजय राज शिंदे यांच्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा ते नेमकं काय म्हणाले ? पाहूया.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अन्यथा आम्ही सहन करणार नाही”, Sushma Andhare यांच्या दौऱ्यापूर्वी Gulabrao Patil यांचा इशारा

Manasi Devkar

“गद्दारांनी लोकांची भावना ओळखावी”- Aaditya Thackeray

Chetan Kirdat

Rane पिता-पुत्र अडचणीत!; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ‘ते’ वक्तव्य भोवलं

News Desk