HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray ED Case | काय आहे विरोधकांची प्रतिक्रिया ?


लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. येत्या 22 तारखेला राज यांना ईडीकडून चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असून त्यांना समन्स बजावण्यात आल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. मात्र “राज ठाकरे यांनी आपल्याला हि बातमी तुमच्याकडूनच समजत आहे. मला अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही”, असे राज ठाकरे काहीच दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. दरम्यान, आता अखेर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान, ईडीकडून राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या या नोटिशीनंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील आवाज उठवायला सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया

Related posts

Thackeray Film । ठाकरे चित्रपटाविषयी आमिर खानने दिली प्रतिक्रिया

धनंजय दळवी

#Gopinathgadh |  पंकजावर माझ्यासारखी वेळ येऊ नये !

Madha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून भाजपचे उमेदवार !

Arati More