HW News Marathi
व्हिडीओ

माणूस खोटा असता तर…रोहित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुक आहे यासाठी मतदान आज होत आहे… यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज बारामती येथील पिंपळी लिमटेक येथे मतदान केले. मतदानानंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवार यांनी भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले हा व्यक्तीगत विषय आहे. पोलीस याबद्दल तपास करत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, हा काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे पुढे येतय, असं रोहित पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडलीय, माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

#RohitPawar #DhananjayMunde #Sharadpawar #NCP #AjitPawar #RenuSharma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

News Desk

पुढील 8 दिवस Mount Mary जत्रेचा उत्साह, वांद्रात जत्रेला भाविकांची मोठी गर्दी

Darrell Miranda

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक

Chetan Kirdat