HW News Marathi
व्हिडीओ

विश्वासघातकी राजे म्हणून पवारांच्या नावे इतिहास होईल, खोत यांची टिका!

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची आज सुरूवात केली. 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे.आज यात्रेच्या पहिल्या दिवशी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केलीय. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलंय. ”पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.

#SadabhauKhot #SharadPawar #FarmersProtest #NCP #DevendraFadanvis #ChandrakantPatil #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Parulekar Show EP 09 | शेतकरी मोर्चा : शेतकऱ्यांवर ही दमनशाही का | Farmers Protest | Delhi

News Desk

Nitin Gadkari म्हणतात,3 वर्षात भारतात America सारखे रस्ते होणार

News Desk

“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis

News Desk