छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणं महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल केला,त्याचबरोबर त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातुन शिवरायांच्या सगळ्या वंशजांना लक्ष केले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत जोरदार हल्ला चढवला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा, ते काहीही गरळ ओकत आहेत ,अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही’.#ChatrapatiShivajiMharaj #SambhajirajeChatrapati #NarendraModi #Sanjayraut #shivsena #JaiBhagwanGoyal #BJP #devendrdafadnavis
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.