HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांनी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडली….राऊतांचा आरोप!

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोपही राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषदमध्ये त्यांनी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर झालेले बोलणे मोदींपर्यंत पोहचवायला हवं होतं असंही मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ‘बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मोदींपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे,’ असंही राऊत म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत केलेले नव्हते, असे स्पष्टीकरण शाह यांनी दिले होते. #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #SharadPawar #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे रात्री उशीरापर्यंत प्रयत्न, तरी उदयनराजे शिवप्रताप दिन कार्यक्रमाला गैरहजर

Manasi Devkar

Sharad Pawar यांनी Raju Shetti यांच नाव Rajyapal नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून हटवलं ?

News Desk

राज्यातला सगळ्यात महाविक्रमी मेळावा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंचा असेल! – Uday Samant

News Desk