HW News Marathi
व्हिडीओ

गौप्यस्फोटांच्या मालिकेत Nawab Malik यांना शरद पवारांचंच पाठबळ?

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं. एकीकडे एनसीबीकडून आर्यन खानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिकांनी थेट एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेच्या अडचणी वाढवल्या. मलिक दररोज नवे दावे खुलासे करून राज्यांत खळबळ उडवून देतायत. नवी नावं, नवे चेहरे, नवी कागदपत्र, जुने संदर्भ, सगळ्यांचे लागेबांधे मलिक असे समोर आणतायत की आता पुढे काय होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच रोज पडतोय. पण नवाब मलिक हे सगळं इतक्या प्रमाणत आक्रमक होऊन का करतायत? त्याच एक कारण सांगितलं जातं की त्यांच्या जावयावर एनसीबीकडून कारवाई झाली ज्याचा राग त्यांच्या मनात आहे. हे कारण गृहीत धरून पण फक्त वैयक्तिक रागापायी कोणतंही पाठबळ नसताना एखादा मंत्री आपल्या पदाचा विचार न करता दररोज असे नवे धक्कादायक खुलासे करेल का? मुख्यतः राष्ट्रवादीचा नेता? त्यामागचं कारण काय आणि हेतू काय? याचबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत

#SharadPawar #DevendraFadnavis #NawabMalik #SameerWankhede #UddhavThackeray #AryanKhan #RamdasAthawale #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

farmers protest :‘लोकसंघर्ष मोर्चा’ शिवाजी मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची चर्चा,शरद पवार दिल्लीत! नेमकं कारण काय?

News Desk

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

Arati More