HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा पहिला खान्देश दौरा, राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात आहे. शरद पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथ शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार आहेत.

भाजपमध्ये अन्याय झाल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शरद पवार २० आणि २१ तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

#SharadPawar #EknathKhadse #Maharashtra #NCP #BJP #Khandesh #Dhule #Nandurbar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale And Chagan Bhujbal | भुजबळ माझ्याकडे या,आठवलेंची ऑफर ..!

Arati More

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

swarit

Dr.Amol Kolhe | खोटी दाढी-मिशी लावून आम्हांला शिवाजी-संभाजी शिकवू नका !

Arati More