HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेना का नाही? राऊतांनी सांगितलं कारण !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२२ जून) दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

#sanjayraut #sharadpawar ncp #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Domestic Violence आणि extra marital affairs या आरोपावरून MNS च्या Gajanan Kale यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk

पंकजा मुंडे बंडाचं निशाण फडकवणार? ‘या’ वृत्ताने खळबळ!

News Desk

Amol Mitkari यांची Eknath Shinde यांना भावनिक साद

News Desk