राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच आईची लेकरं आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. सध्याच्या वातावरणात दोन्ही पक्ष थकले आहेत असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सोलापुरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले दिग्गज नेते मानले जातात. काँग्रेस पक्षातही त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने केलेले हे वक्तव्य अत्यंत सूचक आहे असंच म्हणता येईल. त्याचमुळे त्यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. #SushilkumarShinde #SoniaGandhi #sharadPawar #RahulGandhi #NCP #Congress
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.