शरद पवार हे नाव गेली 5 दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलंय. काहीही घडलं की त्यामागं शरद पवारांचाच हात असेल अशी चर्चा लगेच सुरु होते . मात्र गेल्या 50 वर्षात शरद पवार नेमके कसे आहेत हे कोणालाच कळले नाहीय. त्यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नाही. ते कधी केव्हा काय करतील ? ह्याबाबत अंदाज बांधणं फार कठीण असल्याचं अगदी मोठे राजकीय विश्लेषकही सांगतात. त्यामुळे शरद पवार अत्यंत हुशार मात्र गूढ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांचे व्यक्तिमत्त्व हा पीएचडी विषय आहे, अनेक जण म्हणतात. आता मी शरद पवारांबद्दल इतकं का बोलतेय ? तर एका पट्ठ्याने खरोखरीच शरद पवारांवर आपली पीएचडी पूर्ण केलीय. शिवाजी विद्यापीठाने डॉ. प्रा. दत्तात्रय काळेल यांचया “आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन , एक चिकित्सक अभ्यास…” या प्रबंधाला पीएचडी दिली आहे. मात्र, पीएचडी पूर्ण करूनही डॉ. काळेल यांना शरद पवारांच्या मनाचा ठाव लागलेला नाहीच.नेमकं प्रकरण काय ? पाहूया
#SharadPawar #ChandrakantPatil #PHD #Maharashtra #NCP #PLA #MVA #MahaVikasAghadi #AjitPawar #SupriyaSule #BJP
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.