नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी आज (८ जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गिते आणि बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली होती. दरम्यान, २ दिवसांपूर्वीच माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता भाजपमधील २ नेते शिवसेनेत गेल्याने नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले आहे.
#SanjayRaut #Shivsena #DevendraFadnavis #BJP #UddhavThackeray #ChandrakantPatil #Balasahebsanap #Nashik #Maharashtra #Mahavikasaghadi #VasantGite #SunilBagul