सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभा निवडणुकीसोबतच घ्यावी अशी अट घातली होती. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना लोकसभेच्या पोटनिवडणूकीचा उल्लेख नसल्याने उदयनराजेंची पहिलीच अट मान्य न केल्याच बोललं जात होत.मात्र आता विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार हे निश्चित होणार आहे. कारण, आज (सोमवार) याबाबतची अधिसूचना निघणार असून, अखेर उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळणार आहे.सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज दुपारी एक वाजता निघणार आहे. विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात सभा घेऊन उदयनराजेंना लक्ष्य केले होते. त्यानंतर येथे जोरदार लढत होणार हे निश्चित आहे. #udayanrajeBhosle #SataraLoksabha #DevendraFadnavis #BJP #NCP
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.