HW Marathi
व्हिडीओ

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अत्यंत हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. दिल्लीतील हे आंदोलक शेतकरी थेट लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर आपल्या शेतकरी संघटनेचे झेंडा फडकवला आहे. शेतकऱ्यांकडून हा अत्यंत आक्रमक असा पवित्रा इथे घेण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीत दिसलेले हे चित्र अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत. गेल्या तब्बल ६० दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आणि मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले शेतकऱ्यांचे हे आंदोलन इतके हिंसक आणि आक्रमक का झाले ? काही समाजविघातक वृत्तीमुळे हे झालं का ?ह्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांपासून सरकारशी चर्चा करणारे ४० शेतकरी नेते कुठे आहेत?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतक्या प्रचंड जमावाच्या आक्रमकतेपुढे पोलीसच नव्हे तर हे शेतकरी नेतेही हतबल झाल्याचे चित्र आहे.

#FarmersProtests #RedFort #TractorRally #NarendraModi #ModiGovernment #Delhi

Related posts

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत !

News Desk

Congress-Pravin Gaikwad | प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

News Desk

Maharashtra Assembly 2019 Exit Polls | यंदा राज्यात कोणाची सत्ता ?

Gauri Tilekar