HW Marathi
राजकारण

आपच्या ४१ आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल

नवी दिल्ली | दिल्लीत भ्रष्टाचारच्या मुद्द्यावरून जन्माला आलेला आम आदमी पार्टीच्या आमदारांविरोधात दिल्लीतील लोकायुक्त कार्यालयात भ्रष्टाचाराच्या ४१ तक्रारी दाखल झाल्याआहेत. गेल्या २ वर्षात झालेल्या भ्रष्टाचारात आपच्या आमदारांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ मध्ये अँटी करप्शन विभागाकडे मंत्र्यांविरुद्धच्या ११ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २००८ पर्यंत भ्रष्टाचाराची एकही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती, अशी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळाली आहे.

विशेष म्हणजे सन २००८ पासून आतापर्यंत दिल्ली सरकारमधील आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारींची संख्या २२९ एवढी आहे. त्यापैकी १७२ तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. २०१५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवा खेतरपाल यांनी दिल्लीच्या लोकायुक्तपदी नियुक्त करण्यात आले होते.

 

Related posts

काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभला आहे !

News Desk

हा तर भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

News Desk

‘थापा’ मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले | उद्धव ठाकरे

News Desk