HW News Marathi
राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची घेणार भेट

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर फडणवीस हे आज (15 जुलै) पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आहे. फडणवीस हे राज ठाकरेच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे. या भेटी फडणवीस-ठाकरे दोघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राज्यसभा आणि विधान परिषदेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मत दिले होते. यामुळे भाजपचे उमेदवार दोन्ही निवडणुकीत विजयी झाले होते. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारच्या  बहुमत चाचणीच्या अग्निपरिक्षेत देखील मनसेने सात दिली होती. त्यामुळे फडणवीस-ठाकरे यांची भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते.

फडणवीस हे राज ठाकरेंच्या तब्यातीची विचारपूस करणार असल्याचे चर्चा होत्या. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ठाकरेंनी त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले होते. यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद विराजमान झाल्यानंतर नागपूर येथे गेले होते. तेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

“आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून…,” राज ठाकरेंनी पत्रद्वारे देवेंद्र फडणवीसांचे केले कौतुक

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही कारण…!

News Desk

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते | मोहन भागवत

News Desk

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk