HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

निवडणुकीनंतर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल !

नागपूर | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चौर है असा नारा देऊन राफेल करारच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतदरम्यान त्यांनी म्हटले. निवडणुका झाल्यानंतर चौकशी होईल आणि “चौकीदार” तुरुंगात जाईल अशा शब्दात मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

पुढे राहुल गांधी असे देखील म्हणाले की, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घराबाहेर हजारों चौकीदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर चौकशी होईल आणि चौकीदार तुरुंगात जातील. पंतप्रधान मोदी यांनी राफेलच्या मूळ सौद्यात बदल केला आणि एक विमान १६०० कोटी रुपयांना खरेदी केले.

वायनायडमधून राहुल गांधी यांनी काल (५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानतंर महाराष्ट्रात प्रचार सभेसाठी पोहचले होते. या सभेदरम्यान राहुल यांनी न्याय योजनेचे जोरदार समर्थन केले असून काँग्रेस ७२ हजार टाकणारच असल्याचा दावा करत भाजपवर टीका केली.

 

 

Related posts

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

मदन मोहन मालवीय यांच्या स्मारकास अभिवादनानंतर पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’ सुरू

News Desk