HW News Marathi
राजकारण

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “राज्यपालांनी महाराष्ट्राची माफीही मागितली पाहिजे”, अशी संपत्प प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर केले आहे. राज्यपालांनी मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आज (20 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना शिंदे सरकार आणि राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्यपालांनी महाराष्ट्राची माफीही मागितली पाहिजे. दुसरे म्हणजे केंद्र सरकारने किंवा राष्ट्रपती महोदयांनी राज्यपालांना पदमुक्त केले पाहिजे. खरे तर या खोके सरकारचे मंत्रिमंडळ आहे. ते देखील मंत्रिमंडळात प्रस्ताव पास करून राज्यपालांना माफी मागण्यास भाग पाडू शकतात. परंतु, कुठे ना कुठे तरी महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे मग आपण बघत असाल मागील तीन महिन्यात पाच महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निघून गेले आहेत. शेतकऱ्यांसाठी अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. मुंबई महापालिकेत जोकाही हस्तक्षेप चालू आहे. हे होत असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असे वक्तव्य करणे हे कधीही अपक्षित नव्हते. गेल्य अनेक वर्षात मी अनेक राज्यपालांना भेटलोय. पण, कधीही ऐवढे राजकीय राज्यपाल मी आयुष्यात बघितले नाही.”

राज्यपाल नेमके काय म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे. जेव्हा यापूर्वी विचाले जात होते. तेव्हा ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’, अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, आता महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.”

Related posts

#LokSabhaElections2019 : “फिर एक बार मोदी सरकार”, असे ट्विट करत मोदींची जनतेला साद

News Desk

“शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणाला भाजपचा पाठिंबा…”, सामनाच्या रोखठोकमधून शिंदेंवर टीका

Aprna

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही !

News Desk