HW News Marathi
राजकारण

गौतम गंभीर पुन्हा अडचणीत, परवानगीशिवायच घेतली प्रचारसभा

नवी दिल्ली | माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर यांना एका मागोमाग एक धक्के मिळत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने आज (२७ एप्रिल) गौतम गंभीर यांच्यावर पूर्व दिल्लीत परवानगीशिवाय प्रचारसभेचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतम गंभीर यांच्याकडे २ मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप पूर्व दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी शुक्रवारीच (२६ एप्रिल) केला होता. आम आदमी पक्षाने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली असून यावर १ मे रोजी सुनावणी होणार आहे.

गौतम गंभीर यांच्याकडे राजेंद्र नगर आणि करोल बाग अशी २ ठिकाणांसाठीची मतदान ओळखपत्र आहेत. या प्रकरणी आम आदमी पक्षाने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली असून यावर १ मे रोजी सुनावणी होणार आहे. “गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ घालवू नका. त्यांना लवकरच २ मतदान ओळखपत्र असल्याप्रकरणी दोषी ठरविले जाईल”, असे आतिशी मार्लेना यांनी ट्विट करून म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे”, राऊतांचे संभाजीराजे-उदयनराजेंना आवाहन

Aprna

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

News Desk

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

News Desk