HW News Marathi
राजकारण

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (२७ सप्टेंबर) त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. बागडे कार्यालयात नसल्याने त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारसह अन्य ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांच्या ईडीविरोधातील भुमिके वेळी देखील अजित पवार कुठेच दिसून आले नाहीत. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ते सध्या नॉट रिचेबल येत आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शरद पवार आज सायंकाळी ८ वाजात परिकार परिषद घेणार आहे. कोणालाही कल्पना न देता अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते पवारांनी अंधारात ठेवले होते. तर अजित पवार यांचा चिरंजीव पार्थ पवार यांना देखील त्यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती नव्हते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

News Desk

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे – धनंजय मुंडे

News Desk