HW News Marathi
राजकारण

हा कसा निवडून येतो तेच मी बघतो !

पुरंदर | “शरद पवारांवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. हा माणूस काहीही कामाचा नाही. याचे कुठे कुठे काय काय आहे ते आता शोधावे लागेल. यावेळी हा कसा निवडून येतो तेच मी बघतो”, असे म्हणत यावेळी अजित पवार यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यावर टीका करत त्यांना धमकीवजा इशारा देखील दिला आहे. तर “उद्धवा..गेली ५ वर्ष तुमचीच सत्ता होती रे. तेव्हा १ रुपयात आरोग्य तपासणी का नाही केली ?”, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी शिवसेनेच्या शपथनाम्यावर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ शनिवारी (१९ ऑक्टोबर) सासवडमध्ये झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या शपथनाम्यावर टीका करता अजित पवार असे म्हणाले कि “शिवसेनेने आपल्या शपथनाम्यात असे म्हटले आहे कि, “आता शिवसेनेचे सरकार आले की केवळ १० रुपयात पूर्ण थाळी जेवण देणार. केवळ १ रुपयात आरोग्य तपासणी करून देणार. मात्र, गेली ५ वर्ष राज्यात तुमचीच सत्ता असताना तुम्ही १ रुपयात आरोग्य तपासणी का केली नाही ?”, असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk

EXIT POLL : छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, काँग्रेस मात्र बहुमतापासून दूर

News Desk

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gauri Tilekar