HW News Marathi
राजकारण

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

बारामती | पवार कुटुंबामध्ये सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कलह सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. आज (१५ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी म्हणजे काटेवाडी येथे जाणार होते. मात्र, ते जाणार नसल्याची माहिती श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, आज पार्थ पवार नेहमीप्रमाणे काकांकडे म्हणजे शर्मिला श्रीनिवास पवार यांच्याकड़े जेवयाला जाणार आहेत. तर सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी काल (१४ ऑगस्ट) भेटून गेल्याची माहिती शर्मिला पवार यांनी दिली. मात्र, अजित पवार आज येणार नाहीत हे ही त्यांनी सांगितले. सध्या अनंतारा या कन्हेरी तालुका बारामती येथील निवासस्थानी अजित पवार यांचे थोरले बंधु श्रीनिवास पवार कुटुंबासह राहत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशी देण्याच्या मागणी केली होती. त्यावरून पार्थ यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना कवडीची किंमत नाही असे म्हणत फटकारले होते. यावरून पवार कुटुंबात नाराजी आणि कलह असल्याचे दिसून आले. यासाठी अजित पवार आणि पार्थ पवार आज (१५ ऑगस्ट) काटेवाडी या आपल्या मुळ गावी जाणार असून त्यांच्या कुटुंबाची तेथे बैठक होणार होती. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या समवेत ही बैठक होणार होती.

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले गेले. नाराज झालेले पार्थ पवार हे मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मोठा निर्णय घेण्याआधी पार्थ पवार कुटुंबातल्या व्यक्तींशी चर्चा करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI अहवालानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Aprna

भाजप नेत्याच्या ट्विटरवरून मोंदींवर सडकून टीका

News Desk

#Results2018 : मध्य प्रदेशमध्ये मायावती किंगमेकर ठरणार ?

News Desk