HW News Marathi
राजकारण

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार का ?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत सामिल होण्यासाठी भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची गुप्त बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या गुप्त बैठकीत दोघेजण जागा वाटपावरून बोलणी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

“लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आले पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मते घेतली होती. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे,” असे अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

मनसेला अधिकृतपणे आघाडीत घेतले किंवा मनसेने पाठिंबा दिला तरीही काँग्रेसवर हिंदीविरोधी शिक्का बसू शकतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या हिंदी भाषक पट्ट्यातून काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. मनसेला बरोबर घेतल्यास भाजप काँग्रेसच्या विरोधात मजबुत आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेला बरोबर घेण्याचे अजितदादांचे वैयक्तिक मत असल्याचे देखील राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंनी भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची पुण्यात घेतलेली मुलाखत आणि यानंतर या दोघांची विमानात झालेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Article370Abolished Live : कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव शहांनी लोकसभेत मांडले

News Desk

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk