HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

महाआघाडीतील सर्वांनाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत !

नवी दिल्ली | “गेल्या ५ वर्षांमध्ये आम्ही भ्रष्टाचारी विरोधकांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणले. आता आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर त्यांना थेट तुरुंगात पाठवू” , असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. त्याचप्रमाणे “डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावाला पाठिंबा दिला असला तरीही त्यांच्या या भूमिकेला महाआघाडीतील अन्य पक्षांचा पाठिंबा नाही. कारण महाआघाडीतील सर्वांनाच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत”, असा टोला देखील मोदींनी यावेळी लगावला आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी (१३ एप्रिल) तामिळनाडूतील प्रचारसभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • आम्ही पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काँग्रेसला पोटशूळ उठण्याचे कारण काय ?
  • जो पक्ष आपल्या जवानांच्या कारवाईचे पुरावे मागतो, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार काय ?
  • गेल्या ५ वर्षांमध्ये भ्रष्टाचारी विरोधकांना आम्ही तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. आता आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास त्यांना थेट तुरुंगात पाठवू.
  • काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार, राज्याची सत्ता मिळून ६ महिन्यांच्या आतच पुन्हा काँग्रेसने गरिबांच्या पैशाची लूट सुरू केली.
  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सहकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडींमध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
  • कर्नाटक हे काँग्रेसचे एटीएम होतेच. आता त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांची देखील भर पडली आहे.

Related posts

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

News Desk

प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नाही | रामदास कदम

धनंजय दळवी

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

News Desk