HW Marathi
राजकारण

राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही ?

पुणे । “राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही”, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना टोला लगावला आहे. पुण्यातील गणेश क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते.

अमित शहा यांनी यावेळी बोलतांना राहुल गांधींवर निशाणा साधला.  राहुल गांधीनी दिलेल्या एका भाषणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, “मी राहुल गांधीचे एक भाषण ऐकले होते. आग्रामध्ये राहुल गांधींनी एक भाषण केले होते. त्यावेळी राहुल यांनी म्हटले होते की, या ठिकाणी मी बटाट्याची फॅक्टरी लावणार आहे. त्यांना एवढी साधी गोष्ट कळू नये की, बटाटा फॅक्टरीत उगवतो,  जमिनीच्या खाली उगवतो की जमिनीवर लागतो, असे म्हणत अमित शहा यांनी राहुल गांधीवर आपल्या भाषणातून टीका केली आहे.”

“भाजप हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गेल्या ५५ वर्षात जे कॉंग्रेसने केले नाही ते आम्ही करुन दाखवले. अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटाकांचा आम्ही विचार केला आहे”, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

#LokSabhaElections2019 : राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार ?

News Desk

सुखबीर सिंग बादल यांना विचारांची बद्धकोष्ठता । नवज्योतसिंग सिद्धू

News Desk

शास्त्रीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रशासनाची अपुरी मदत

News Desk