HW News Marathi
राजकारण

भाजपचा भ्रमाचा फुगा फुटला…पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून अमोल मिटकरींचा भाजपला टोला!

पुणे | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भाजपने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपुर या निकालावरून भाजपच्या उद्याच्या, परवाच्या व अनेक वर्षांच्या राजकारणाच्या दाही दिशा स्पष्ट. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, मुनगंटीवार यांच्या अहंकाराला टाचणी. भ्रमाचा फुगा फुटला. धुळे नंदुरबार पण आयात केलेला निकाल, अशा शब्दांत त्यांनी दरेकर यांच्या बातमीला रिट्विट करत उत्तर दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Aprna

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Aprna