HW News Marathi
राजकारण

हज यात्रेकरूंच्या तिकिटांवर जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार | आठवले

मुंबई | भारतातून हज यात्रेस जाणाऱ्या यंत्रकरूंच्या प्रवासी भाड्यावर 18 टक्के जी एस टी लावण्यात येत आहे. अन्य विमानप्रवासावर जीएसटी केवळ 5 टक्के आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या विमान प्रवासावरील जीएसटी 18 टक्केहून कमी करून 5 टक्के करण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले.

हजयात्रेकरूंच्या विमानप्रवासावरील जीएसटी 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के करावा या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संविधान बंगला बांद्रा येथे भेट घेऊन दिले. या शिष्टमंडळात रिपाइं चे महाराष्ट्र्र प्रदेश अल्पसंख्यांक आघाडी चे अध्यक्ष जमाल अन्सारी ; महाराष्ट्र्र संघटक सचिव मौलाना अब्दूर रशीद अन्सारी ; महाराष्ट्र्र उपाध्यक्ष अश्रफ मोमीन; महाराष्ट्र्र सचिव कलाम शेख ; भिवंडी अल्पसंख्यांक अध्यक्ष गुलाम मोमीन आदी मान्यवरांचा सहभाग होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

News Desk

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टॉलिवूडने केले मतदान

News Desk

काँग्रेस पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे !

News Desk