नवी दिल्ली । अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी तातडीने होणे गरजेचे आहे, असे महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते .
Supreme Court has rejected plea seeking early hearing in Ayodhya title suit in connection with Ram Janmabhoomi Babri Masjid case. pic.twitter.com/JHRmEqtdU6
— ANI (@ANI) November 12, 2018
यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतू ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेने दाखल केली होती. या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असे म्हणत न्यायालयाने महासभेची याचिका फेटाळून लावली.
याचिका फेटाळून लावल्यानंतर, हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रवर्णी यांनी न्यायालयाच्या निर्णयाला दुर्दैवी असे म्हटले आहे, त्यांनी मोदी सरकारला एक इशारा दिला आहे. आणि सांगितले की, “सरकारने लगेचच राम मंदिरवर संसदेत अध्यादेश काढले नाही तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विरोध होईल”.
श्रीराम मन्दिर केश में सुप्रीम कोर्ट द्वारा तत्काल सुनवाई से इंकार दुर्भाग्य पूर्ण,मोदी सरकार तत्काल लाये राममन्दिर हेतु अध्यादेश,अन्यथा 2019 चुनाव में होगा विरोध💐 स्वामी चक्रपाणि महाराज-राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारत हिन्दू महासभा pic.twitter.com/VPit39b0aa
— Swami Chakrapani Maharaj (@SwamyChakrapani) November 12, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.