HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

मुंबई | देशभरात काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची (Bharat Jodo Yatra) जोरदार चर्चा आहे. ही यात्रा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही भारत जोडो यात्रा आज (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला.

यानंतर ऋतुजा लटकेंनी मात्रोश्रीवर जाऊन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषदे उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर आज शरद पवार हे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात अशी आहे भारत जोडो यात्रा

ही यात्रा महाराष्ट्रात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास देगलूर येथे आगमन होणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेस सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात या यात्रेची सुरुवात नांदेडमधून होणार आहे. यात्रेच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. राज्यात ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नांदेडमध्ये आले आहेत.

 

 

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

News Desk

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग | सचिन सावंत

News Desk