HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : भाजपची चौथी यादी जाहीर, ६ राज्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा

नवी दिल्ली | भाजपने लोकसभा उमेदवारांची चौथी यादी काल (२३ मार्च) जाहीर केली. भाजपने ४८ लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत ६ राज्यांच्या ४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश १५, गुजरात १५, झारखंड १०,  हिमाचल प्रदेश ४ तर कर्नाटक आणि गोवामधून प्रत्येकी २-२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा उल्लेख नाही.

चौथ्या यादीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून नरेंद्र साईवलीकर या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना मोरेना तर अनुराग ठाकूर यांना हमीरपूर मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. जयंत सिन्हा यांना हझारीबाग, जनार्दन मिश्रा यांना रेवा, राकेश सिंग यांना जबलपूर, सुरेश कश्यप यांना शिमला, किशन कपूर यांना कांग्रा तर निशिकांत दुबे यांना गोड्डा यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीबरोबरच गोवा आणि गुजरातमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीतील ६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये गोवा आणि गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रत्येकी ३-३ उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली.

भाजपच्या चौथ्या यादी या सहा राज्यांचा समावेश 

 

  • मध्य प्रदेश – १५
  • गुजरात – १५
  • झारखंड – १०
  • हिमाचल प्रदेश – ४
  • कर्नाटक – २
  • गोवा – २

 

 

 

Related posts

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk

#LokSabhaElections2019 : मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk