HW News Marathi
राजकारण

भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे

मुंबई | शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालणार पक्ष आहे. ज्या वेळी देशातील कथाकथित धर्मनिरपेक्ष एकत्र होतील, त्या त्या वेळी या देशातील सर्वधर्म समभाव मानणारे हिंदुत्त्ववादी पक्षानांना एकत्र यावेच लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटले.

अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने युतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोख उत्तरे दिली.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना-भाजपची युती होणार का असे तुम्हाल का वाटेत असा सवाल विचारला होता. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती आधीच चर्चेला उधाण आले होते.

या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीच्या आधारावर ही मुलाखत घेण्यात आली होती. राज ठाकरे आणि शरद पवार यांची मुलाखती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकार देश तोडण्याचे राजकारण करते | राहुल गांधी

Adil

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Aprna

अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Aprna