HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उमेदवार यादीत स्मृती इराणींच्या नावापुढे धर्माचा उल्लेख, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा

नवी दिल्ली | भाजपने गुरुवारी (२१ मार्च) आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण १८४ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या देखील नावाचा समावेश असून त्यांना उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी मिळाले आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या नावापुढे कंसात पारशी असे लिहीत त्यांच्या धर्माचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आता भाजप धर्माचे राजकारण करीत आहे असे म्हणत, काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नॅशनल मीडिया कोऑर्डिनेटर राधिका खेरा यांनी याबाबतचे ट्विट करत भाजपच्या उमेदवार यादीचा फोटो जोडला आहे. “निवडणुकांमध्ये भाजप खरा चेहरा पुन्हा सर्वांसमोर आला आहे. नावामध्ये धर्माचा उल्लेख करून हे सिद्ध करीत आहेत कि हे किती घाबरले आहेत. समाजाचे विभाजन करण्यासाठी हे लोक या स्तरापर्यंत जाऊ शकतात”, अशा आशयाचे ट्विट राधिका खेरा यांनी केले आहे. काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील खेरा यांचे ट्विट रिट्विट केले आहे.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीत २० राज्यांतील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघामधून भाजपकडून पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेठीचे विद्यमान खासदार आहेत. त्याचप्रमाणे यंदाही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

Related posts

बंगालमध्ये घडलेला हिंसाचार भाजपप्रेरित । जयंत पाटील

News Desk

#MarathaReservation : उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आंदोलकांचे उपोषण मागे ?

News Desk

अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये !

News Desk