नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने काल (२० डिसेंबर) परवानगी दिली होती. परंतु उच्च न्यायालयाने दिलेली ही परवानगी आज (२१ डिसेंबर) मुख्य न्यायाधिशांच्या खंडपीठाने रद्द केली आहे. त्यामुळे २२,२४ आणि २६ डिसेंबरला राज्याच्या विविध भागांमधून सुरू होणाऱ्या भाजपच्या रथयात्रेत पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.
Calcutta High Court’s Chief Justice bench has quashed the single bench’s order allowing BJP's yatra in West Bengal. pic.twitter.com/ymV2we6mlx
— ANI (@ANI) December 21, 2018
याआधी गुरुवारी (२० डिसेंबर) पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांच्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाने रथयात्रेला परवानगी दिली तरी प्रशासनाला निर्देश दिले होते की, या रथयात्रेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्याचप्रमाणे या रथयात्रेमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जातीय तणाव निर्माण होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी भाजपची असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
‘लोकशाही बचाव यात्रा’ असे अमित शहा यांच्या रथयात्रेचे नाव होते. ४० दिवस ही रथयात्रा पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांत जाणार होती. त्यासाठी भाजपने जय्यत तयारी देखील केली होती. तीन रथ, एसी बसेस यासह मोठा लावाजमा तयार ठेवला होता. पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणांहून ही रथयात्रा निघणार होती. २२ डिसेंबरला कुचबिहार जिल्ह्यापासून रथयात्रेला सुरुवात होणार होती. त्यानंतर २४ डिसेंबरला दक्षिण परगना आणि २६ डिसेंबरला बीरभूमच्या तारापीठ मंदिरातून ही रथयात्रा निघणार होती.आता परवानगी रद्द करण्यात आल्याने भाजपला धक्का बसला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.