गोवा | गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, प्रमोद सावंत यांना आज (२० मार्च) गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (१८ मार्च) रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्याचप्रमाणे मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन्ही आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार झाला आहे. दरम्यान, प्रमोद सावंत आज गोव्यात बहुमत सिद्ध करू शकणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Goa Chief Minister & BJP leader Pramod Sawant ahead of Floor Test: We have 100 per cent confidence that we will win. pic.twitter.com/q6WXhHMJko
— ANI (@ANI) March 20, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.