HW News Marathi
राजकारण

सरसंघचालक मोहन भागवतांवर ‘मोक्का’ लावा !

मुंबई | राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले होते. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके 47 रायफल कशी आली ?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या नावावर जिल्ह्याजिल्ह्यांत दंगली घडवल्या जात आहेत. दोन दिवस कर्फ्यू असताना संघाने रस्त्यावर बंदुका नाचवल्या होत्या. संघाकडे ही हत्यारे आली कुठून याचा शोध घ्यावा. कोणाकडे शस्त्रे सापडली की त्याच्यावर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवार्इ करा. जर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाहीतर कोर्टात जाऊ आणि रस्त्यावर उतरून मोर्चा काढू असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायूदल आहे. राज्यात संरक्षणासाठी पोलिस आहेत. मग संघ प्रतिसैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. ते म्हणाले, या प्रतिसैन्याकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल. संघाच्या लोकांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत. प्रशासनाने ही हत्यारे काढून घेतली नाहीत, तर राज्यातील सर्व रस्ते बंद करू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला आहे.

कायद्यानुसार मोहन भागवत यांच्यावर मोक्का उपस्थित केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतका मोठा शस्त्रसाठा कसा आला, याचा शोध घेण्याची गरज आहे. परंतु, तो घेतला जात नाही. सरकार सध्या ऑक्सिजनवर असून चार राज्यांच्या निवडणुकानंतर ते व्हेंटिलेटरवर जार्इल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

Aprna

#LokSabhaElections2019 : शिवसेनेपुढे जालन्यानंतर आता उस्मानाबादचा तिढा

News Desk

“मी महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतलेय” उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

Aprna
देश / विदेश

पेट्रोलच्या किंमतीत वाढ कायम, डिझेलच्या किंमती स्थिर

Gauri Tilekar

मुंबई | देशभरात इंधन दरवाढ थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मुंबईत आज (शनिवारी) पेट्रोलच्या किंमती ११ पैशांनी वाढल्या आहेत. मुंबईत आता पेट्रोलची किंमती ८९.८० रुपये इतकी झाली आहे. एकीकडे पेट्रोलच्या किंमतीत दर दिवशी वाढ होत असताना दुसरीकडे डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळात सतत वाढणाऱ्या महागाई विरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद जरी लाभलेला असला तरी सरकारवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारे रुपयाचे अवमूल्यन तसेच कच्च्या तेलाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

देशभरात अनेक राज्यांत इंधनाच्या किंमतींनी आधीच नव्वदी पार केली असून मुंबईतदेखील लवकरच पेट्रोलच्या किंमती नव्वदी गाठण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पेट्रोलच्या किंमतीत १२ पैशांनी वाढ झाली असून पेट्रोल प्रति लिटर ८२.४४ रुपये एवढे झाले आहे. दिल्लीतही डिझेलची किंमत मात्र ७३.८७ रुपयांवर स्थिर आहे.

 

Related posts

अमित शहा यांचे पद येणार धोक्यात

News Desk

लढाऊ विमानाला आग, विमानाचे तुकडे तुकडे झाले तरी पायलट बचावला

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

swarit