HW News Marathi
राजकारण

ख्रिश्चियन मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली | ऑगस्ता वेस्टलँड म्हणजे व्हीव्हीआयपी चॉपर घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (५ डिसेंबर) ख्रिस्तियन मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ऑगस्ता वेस्टलँड प्रकरणात ३६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित राजकीय नेत्यांशी मध्यस्थी केल्याचा आरोप ख्रिश्चियन मिशेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टाने आज(५ डिसेंबर) मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दुबई कोर्टाच्या प्रत्यार्पणानंतर काल (४ डिसेंबर) संध्याकाळी यूएइने ख्रिस्तियन मिशेलला भारताच्या ताब्यात दिले. सीबीआयने रात्रीच मिशेल दिल्लीला आणले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वातील पथकाने मिशेल यांना भारतात आणून न्यायालयात हजर केले. सीबीआयकडून अॅड. डीपी सिंह यांनी बाजू मांडताना मिशेल यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर, न्यायालयाने परवानगी देत हा मिशेल यांना ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले आहे. कोठडीत मिशेल यांच्याकडून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि माहिती काढण्याचा सीबीआयचा प्रयत्न असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-फडणवीस सरकारकडून बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू

Manasi Devkar

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, मुख्यमंत्र्यांचा पवारांना सल्ला

News Desk