HW News Marathi
राजकारण

विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी ईडीचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर !

मुंबई | “शरद पवार यांचा त्या बँकेशी कोणताही संबंध नाही. ते त्या बँकेत संचालक राहिले नाहीत किंवा त्यांच्याकडून कधी कोणते आदेश दिले गेले नाहीत. मात्र, सध्या विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी ईडीचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे”, असे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी शरद पवार यांचा कोणत्याही पद्धतीने संबंध नाही. म्हणूनच, जनतेने शरद पवार यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्याचा निषेध व्यक्त केला पाहिजे”, असे आवाहन देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, केवळ विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी ईडीचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे”, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवार यांच्यावर होणाऱ्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे .याच कारवाईच्या निषेधार्थ शरद पवार यांच्या समर्थकांकडून बुधवारी (२५ सप्टेंबर) बारामती आणि पुण्यात बंद पाळण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचा अखेर राजीनामा

News Desk

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर 8 ऑगस्टला होणार सुनावणी

Aprna