HW News Marathi
राजकारण

शरद पवार ईडीचा पाहुणचार घ्यायला स्वत: जाणार

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मी स्वत: २७ सप्टेंबरला ईडीचा पाहुणचार घ्यायला जाणार आहे,” असे पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज (२५ सप्टेंबर) पत्रकार परिषदे घेतली होती. पवार पुढे म्हणाले की, मी तपासयंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

“विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढील महिनाभर मी बाहेर राहणार आहे. त्यामुळे मी स्वत २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यकालयात जाणून त्यांना माहिती देऊन त्यांचा पाहुणचार घेणार असल्याचे म्हटले.” “दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही, असे म्हणत पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझापूर्ण विश्वास असून मी तपासयंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे पवारांनी पत्रकारांना सांगितले. “माझ्यावर झालेली ही कारवाई माझ्या महाराष्ट्र दौऱ्यावर जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसातामुळे झाल्याची शंका पवारांनी व्यक्त केली.”

पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

  • राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचे प्रतिसादामुळे ही कारवाई झाल्याची शंका
  • विधानसभा निवडणुकीच्या प्रसारासाठी महिनाभर बाहेर राहणार आहे
  • महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे.
  • दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पुर्ण विश्वास आहे
  • ईडीच्या कार्यालयात जाणून माहिती देईन आणि पाहुणचारही घेईन
  • २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मी स्वत: ईडीच्या कार्यलयात जाणार
  • तपासयंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार
  • मी कार्यवाईला सहकार्य करणे
  • केंद्र सरकार म्हणजे ईडी असल्याचा आरोप पवारांनी केला
  • कारवाईचा माझ्या आयुष्यातला हा दुसरा प्रसंग
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची सांत्वनपर मदत द्या !

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर 8 ऑगस्टला होणार सुनावणी

Aprna