रायपूर | छत्तीसगढ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. परंतु मतदान केंद्रत गेलेल्या बहुतांश लोकांचे नावे मतदार यादीतून गहाळ झाले. त्यामुळे लोकांनी मतदान केंद्र बाहेर येऊन गोंधळ घातला. गेल्या २५ वर्षापासून छत्तीसगढमध्ये राहत असलेल्या लोकांची नावे देखील मतदार यादी नसल्याने लोकांमध्ये नाराजी दिसून आली असून हा सर्व प्रकार जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावे मतदारयादीतून गायब लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदानाला दुपारी पर्यंत २५.१५ टक्के इतके मतदान झाले आहे.
#ChhattisgarhAssemblyElections2018: Voters in Jagdalpur's Gandhi Nagar ward protest outside the polling centre, say, "The names of many voters are missing including those who have been living here for the past 25 years." pic.twitter.com/AGri8PE626
— ANI (@ANI) November 12, 2018
25.15% voter turnout recorded till 1 pm in the first phase of #ChhattisgarhAssemblyElections2018. pic.twitter.com/3GUVRkPluM
— ANI (@ANI) November 12, 2018
छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.