HW News Marathi
राजकारण

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

नवी दिल्ली | महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकी आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात दिवळीपूर्वीच नवे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेआज (२१ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबरही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितली आहे. तसेच उमेदवाऱ्यांच्या अर्जाची छाननी ५ ऑक्टोबरला होणार तर ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार असून १.८ लाख ईव्हीएम मशीन्सचा मतदानात वापर करण्यात येणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया २ नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या ९० जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • दिवाळीपूर्वी महाराष्ट्र नवे सरकार स्थापन होणार
  • महाराष्ट्र आणि हरियाणा २४ ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे
  • महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
  • २८ लाखापेक्षा जास्त पैसे खर्च करण्याची परवागी
  • ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
  • उमेदवारांच्या छाननी ५ ऑक्टोबरला होणार
  • ४ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
  • २७ सप्टेंबरपासून उमेदवारी भरण्याची अधिसूचना जाहीर होणार
  • देशभरात याच वेळी पोटनिवडणुका होणार
  • निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांने त्यांच्यावरील गुन्हेसंबंधातील सर्व माहिती देणे बंधनकारक – आयोग
  • विधानसभा निवडणुकीत प्लासिकचा वापरावर बंदी – आयोग
  • निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथक
  • निवडणुकीच्या तोंडावर खास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरपर्यंत
  • महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १.८ लाख ईव्हीएम मशीन्सचा वापर होणार
  • महाराष्ट्रसह हरियाणात आजपासून आचारसंहिता लागू
  • महाराष्ट्रात एकूण ९.९४ कोटी मतदारांनी नोंदणी झाली आहे.
  • महाराष्ट्रात २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार
  • हरियाणात ९० जागांसाठी विधानसभा निवडणूक
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नायडूंनी २४ तासांत दुसऱ्यांदा घेतली पवारांची भेट, राजकीय हालचालींना वेग

News Desk

#RamMandir : राम मंदिर उभारणीला विरोध केला, तर सरकार पाडू !

News Desk

योगी आदित्यनाथ आज पालघरमध्ये

News Desk