HW News Marathi
राजकारण

बावनकुळे आमचा हिरा, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

नागपूर । “चंद्रशेखर बावनकुळे आमचा हिरा आहे. ते आता आहेत त्यापेक्षा नक्कीच खूप मोठे होतील”, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागपूरमधील आयोजित प्रचारसभेत शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस बोलत होते. विधानसभेच्या प्रचाराचा आज (१९ ऑक्टोबर) अंतिम दिवस आहे. सोमवारी (२१ ऑक्टोबर) संपूर्ण राज्यभरात विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर येत्या गुरुवारी (२४ ऑक्टोबर) विधानसभेचे निकाल जाहीर होतील.

चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या केलेल्या कौतुकानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक केले. “बावनकुळे येत्या काळात आता आहेत त्यापेक्षा खूप मोठे होतील”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, MSRDC, MMRDA, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, ” मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ?

News Desk

मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी

News Desk