HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नगरमध्ये सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसकडून जाहीर पाठिंबा

अहमदनगर | नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.भाजपने डॉ. सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांना नगरमधून काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नगरच्या राजकारणने वेगळेच वळण घेतले चित्र दिसत आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजयने भाजपत प्रवेश केल्यानंतर अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला होता. नगर जिल्ह्यात विखे घराण्याचे संबंध अधिक दृढ आहेत. तिथल्या नागरिकांशी विखे कुटूंब ऋणानुबंध जोडले गेले आहेत. पक्षापेक्षा संबंधांना अधिक माणणारे लोक तिथे आहेत याचाच फायदा सुजय विखेंना राजकारणात देखील होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सुजय विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसकूडन संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच फूट पडली आहे. यामुळे संग्राम जगतापांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे बोलल्या जात आहे. नुकताच काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी भाजपच्या सुजय विखेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना नगरमधील चित्र आघाडीसाठी नक्कीच धक्कादायक आहे.

Related posts

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk

राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

News Desk

सिबीआय कार्यालयाबाहेर राहुल गांधींचे आंदोलन

अपर्णा गोतपागर