HW News Marathi
राजकारण

राजकारणात बदलली उपोषणाची व्याख्या

पुणे | सरकार विरोधात राहुल गांधींनी केलेल्या उपोषणा आधी कॉंग्रेसच्या नेत्यांनी छोलेभटूरेवर ताव मारला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी खालेले छोले भटुरे सोशल मिडीयाच्या माध्यमातून भारतभर झाले. कॉंग्रेसच्या उपोषणाचा फज्जा उडाल्या नंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रासह देशभरात गुरुवारी उपोषण ठेवले होते. परंतु कॉंग्रेसच्या उपोषणाप्रमाणे भाजपचे उपोषणही पक्षातल्या काही भुक्कड नेत्यांमुळे फ्लॉप ठरले. कॉंग्रेसचे उपोषण फ्लॉप ठरल्यानंतर हे उपोषण नव्हे तर दलितांविषयी मगरीचे आश्रू असल्याची टिका सत्ताधारी भाजप कडून करण्यात आली होती. मात्र गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये भाजप आमदार वेफर्सवर ताव मारताना दिसत आहेत.

भाजपच्या एक दिवसीय उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरजवळच्या फुटपाथवर गुरुवारी भाजपचे नेते उपोषणाला बसले होते. यामध्ये खासदार अनिल शिरोळे, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपोषणात सुरुवातीला आमदार भीमराव तापकीर आणि बाळा भेगडेही उपोषणाला बसले होते.

गुरुवारी उपोषणादरम्यान जिल्हा खरीप हंगामाची विभागीय बैठक आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. आमदार भेगडे आणि तापकीर यांनी या बैठकीला हजेरी लावली. नेहमप्रमाणे बैठक सुरू असताना पुढे आलेले सँडविच, मिठाई आणि वेफर्स पहाताच उपोषणाचा विसर पडलेल्या भाजपच्या या आमदारांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला. सध्या छोले भटुरेंचे राजकारण संपते न संपते तोपर्यंजपच्या या आमदारांनी वेफर्सवर ताव मारतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होतोय. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे कॉंग्रेसच्या छोले भटूरेंना भाजपने वेफर सॅंडविचने प्रतिउत्तर दिले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड

News Desk

…तर राज्यात नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात !

News Desk

उदय सामंत नॉट रिचेबल; शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने रवाना

Aprna