HW News Marathi
राजकारण

अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत मतभेद ? 

सोलापूर । अहमदनगरची जागा काँग्रेसला देण्याबाबत राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचे दिसून आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीतील अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (१मार्च) दुपारी अकलूज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संध्याकाळी तातडीने पक्षांकडून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे ट्विट करून स्पष्ट केले आहे.

अहमदनगरच्या जागेबाबत प्रश्न विचारताच पवार यांनी होकारार्थी मान हलवत ‘होय.. काँग्रेसला’, असे म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल सायंकाळी लगेच जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबतच्या बातम्या तथ्यहीन असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपणार; सुटका होणार की कारागृहातील मुक्काम वाढणार?

Aprna

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अंमलबजावणी करा !

News Desk

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk