HW News Marathi
राजकारण

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

मुंबई | दहीहंडीच्या दिवशी उत्साहाच्या भरात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणा-या राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राम कदमांच्या या बेताल वक्तव्यावर अनेक राजकारण्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पत्रकार परीषद घेऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राम कदमांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पहायला मिळाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम कदमांवर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने कारवाई करावी. तसेच अशी विधाने करणाऱ्यांना कोणीही पक्षात घेऊ नये, कुणीही उमेदवारी देऊ नये.माता भगिनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

रघुराम राजन यांना पुन्हा का बोलवता?

आजच्या सामना संपादकीय मधून रुपयाचे मुल्य घसरले आहे यावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, महागाई तर आहेच आणि त्याचा विरोध आम्ही सत्तेत राहून करत आहोत. जर भाजप सरकारने नोटबंदीच्या वेळी रघुराम राजन यांना चुकीचे ठरवले तर मग त्यांना सध्या परत बोलवण्यासाठी प्रयत्न का सुरू आहेत? नोटाबंदी बाबत आमची भूमिका कळण्यास त्यांना दोन वर्ष लागली.

बेटी भगाव असा नारा आहे का? ठाकरेंचा सरकारला सवाल

पंतप्रधान मोदींनी देशात बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत मुलींच्या शिक्षणाचा प्रचार तसेच मुलींच्या संरक्षणासाठी प्रचार सुरु केला आहे. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार अशी वक्तव्य करतात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमांवर सवाल उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राचा कारभार सचिवांकडून नव्हे लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे! : अतुल लोंढे

Manasi Devkar

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस

News Desk
राजकारण

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

News Desk

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले. 2014 साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे. नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. अतुल बनसोडे या कवीने एका ओळीत त्या सगळ्यांचे थोबाड फोडले आहे – ‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’ सत्य हेच आहे! ते नगरच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आले, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर जहरी टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. अतुल बनसोडे या कवीने एका ओळीत त्या सगळ्यांचे थोबाड फोडले आहे – ‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’ सत्य हेच आहे!

ते नगरच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने महापौर बसवला हा शिवसेनेला धक्का वगैरे असल्याचे लिहिले आणि बोलले जात आहे. शिवसेनेला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला मिळणारच होता. त्यांच्या पाठिंब्यावर नगरची गाढव चढाई घडली नसती तर मात्र आम्हाला धक्का बसला असता. 2014 साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने महापौर बसवला यासाठी भाजपचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. कारण नगरचा निकाल त्रिशंकू असला तरी

भाजप हा तिसर्‍या क्रमांकावर

फेकला गेला होता. एकूण 68 जागा आहेत व बहुमतासाठी किमान 35चा आकडा लागणार होता. शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, बाकी इतर सटरफटर एक-दोन असे संख्याबळ होते. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होऊ देणे हीच लोकभावना व कौल होता. एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे. कोडगेपणाचा कळस असा की, भाजपचे (‘ईव्हीएम गडबड’ फेम) मंत्री म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला. मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ऊठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी काय? नगरमध्ये गिरीश महाजन (‘ईव्हीएम’ फेम) यांनी ज्या पद्धतीने महापौर बसवला ते पाहता याच पॅटर्नने त्यांनी जळगाव-धुळ्याच्या महानगरपालिका जिंकून दाखवल्या. धुळे महानगरपालिकेत भाजप कधीही पाच-सात जागांच्या वर गेली नव्हती तेथे एकदम पन्नासचा आकडा गाठून सत्ता काबीज केली जाते. जळगावातही तेच. हा खेळ पैशांचा, सत्तेच्या माध्यमातून दाबदबावाचा आणि तांत्रिक घोटाळ्याचा आहे. नगरमध्ये त्यांना हे घोटाळे करणे जमले नाही. कारण

हवा शिवसेनेची

होती व ती स्पष्ट दिसत होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले. नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादीसोबतच्या ‘अनैतिक’ संबंधातून झाला आहे. नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली. अतुल बनसोडे या कवीने एका ओळीत त्या सगळ्यांचे थोबाड फोडले आहे –

‘‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं!’’

सत्य हेच आहे! ते नगरच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आले.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक सुरू

Gauri Tilekar

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय

Aprna