HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपला मतदान करू नका, बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांचे आवाहन

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचे आवाहन बॉलिवूडमधील ६०० दिग्गज कलाकारांनी केले आहे. या कलाकारांच्या यादी नसरुद्दीन शाह यांच्यासह दिग्दर्शक अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांचा समावेश आहे. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केले आहे.  या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरे तर हे पत्र एक दोन, नव्हे तर १२ भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.

भाजप सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली, असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशिपच्या नावाखाली कलाकारांची होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणे आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. यामुळे सर्व कलाकारांनी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Related posts

अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली !

News Desk

संघाकडून शिकण्यासारखे असे काहीही नाही !

News Desk

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

News Desk